पंतप्रधानांनी बुधवारी वाढत्या कोरोना संख्येचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीवर बोलताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राऊत म्हणाले मी या झालेल्या बैठकीवर बोलणार नाही. ते योग्यही नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ती बैठक होती. पंतप्रधान कोरोना स्थितीवर मार्गदर्शन करणार होते, पण त्यांनी वेगळ्याच विषयाच्या तारा छेडल्या, असे म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे.
पंतप्रधानांची भूमिका योग्य नाही
27 एप्रिल बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना सोडून इंधनाच्या विषयाला हात घातला, जो अनावश्यक होता. उद्धव ठाकरेंनी मराठी बाण्याला जागून जे काही उत्तर द्यायचे ते दिले. देशाच्या पंतप्रधानांनी देशासाठी जशी भूमिका असायला हवी होती, तशी भूमिका नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा शकुनी काकांचा दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव, पडळकरांचा पवारांवर गंभीर आरोप )
ते कोणासोबतचे फोटो आहेत तो प्रश्न नाही…
लकडावालाचे महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतच्या फोटोंबाबत बोलताना, संजय राऊत म्हणाले की, कुणाबरोबर कुणाचे फोटो आहेत हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की कुणाबरोबर त्यांनी आर्थिक व्यवहार केलेत याची चौकशी व्हावी. ईडीने त्यांनी चौकशीसाठी का बोलावले नाही हा प्रश्न आहे. सध्या मोबाईलच्या जमान्यात कोणाचाही फोटो कुणासोबतही निघू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community