आधी अरुणाचल प्रदेश, काश्मीर बघा, मग महाराष्ट्राकडे वळा!

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाच वर्षांत काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला, असे राऊत म्हणाले.

87

राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून झाले की मग भाजपने पूर्णपणे महाराष्ट्राकडे वळावे आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी. राजकारणात लोकशाहीत एखादे सरकार लोकशाही मार्गाने हटविण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर जी लोक घुसले आहेत आणि गावेच्या गावे  बसवली आहेत, त्यांना उखडण्यासाठी काही करता येत असेल, तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मारला.

नोटा बंदीला ५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असे आवाहन केले आहे. जेपी नड्डा सद्गृहस्थ आहेत. चांगले नेते आहेत. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेकण्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची जी घुसखोरी सुरु आहे, चीनने आपल्या हद्दीत गावे बसवली आहेत. ते आधी उखडून फेकले पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांचे अड्डे वाढले आहेत. त्यांना ताबडतोब उखडून फेकले पाहिजे, असे आव्हान राऊत यांनी केले.

(हेही वाचा : नगर रुग्णालय आग : आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आमने-सामने)

नोटाबंदीचा निर्णय हा आर्थिक डिजास्टर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाच वर्षांत काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला. देशात सर्वात जास्त काळापैसा वाढला. अशा प्रकारे नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली. नोटाबंदीचा निर्णय हा आर्थिक डिजास्टर होता. नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांना नोकरी आणि प्राण गमवावा लागला. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसाडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मगाायला हवी, असे राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.