पूर्वीचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फरक आहे. त्यांना सनसनाटी निर्मण करण्याचा छंद कधी जडला माहित नाही. राजकरणात एकमेकांशी बोलणे होते, फडणवीस जात होते आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये येत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतीलही, पण आज ते बोलण्याची काय आवश्यकता होती? त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तर फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायची ऑफर दिली होती ना, आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, अजून किती काळ उपमुख्यमंत्री राहणार आहात, हे दिसेलच, सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा!, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
२०२४ ची तयारी चालू केली
पुण्याच्या निवडणुकीत पोलिसांसोबत पैसे वाटले जात आहेत यात तथ्य असू शकते कारण या आधीही भाजपच्या राजवटीत पोलिसांच्या वाहनातून पैसे वाटले गेले होते, असेही राऊत म्हणाले. महापालिका निवडणूक घेण्याची हिंमत असायला हवी, सरकारे पाडण्यासाठी जी निर्भयता दाखवतात तीच निर्भयता त्यांनी निवडणूक घेण्यसाठी दाखवायला पाहुजे होती. देशभरातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, २०२४ ची तयारी आम्ही हळूहळू चालू केली आहे. अरविंद केजरीवाल हे उद्धव ठाकरे यांना भेटले, ते लढवय्ये नेते आहेत. दिल्लीत किती छळ होत आहे तरीही ते लढत आहेत. यामुळे आप असेल किंवा आम्ही सर्व जण संघर्ष करून पुढे जाऊ. पंजाबच्या परिस्थितीची केवळ तेथील मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही तर केंद्राचीही आहे, कारण हे राज्य सीमा भागावर आहे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा आता औरंगाबादचे नामकरण प्रशासकीय पातळीवर कसे होणार? फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया )
Join Our WhatsApp Community