आयकर आणि ईडीला मी पुराव्यासह 50 जणांची नावे पाठवली आहेत. त्यांचा मी वारंवार उल्लेख केला आहे. पण ईडी आणि आयकर याची दखल घेत नाही, त्यांना एक जबाबदार खासदार काही बोलत असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे, असे ईडीला वाटत नाही. मुंबईत मात्र धाडीवर धाडी पडत आहेत. सकाळापासून पाहत आहे. आज काही कार्यकर्त्यांवर आयकरच्या धाडी पडत आहेत. काही भानामती सुरू आहेत. आता आयटीच्या भानामती सुरू आहे. जोपर्यंत बीएमसीच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत प्रत्येक वॉर्डात धाडी पडतील, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
सरकार पाडण्यासाठी ईडीच्या धाडी
आम्ही ठरवले आपणही रेड टाकावी. आम्हाला घुसायचा अधिकार आहे. आमच्या घरात कुणी घुसत असेल तर मुंबईत शिवसेनेलाही घुसायचा आणि घुसवायचा अधिकार आहे. केवळ महाराष्ट्र आणि बंगालमध्येच सिलेक्ट लोकांनाच टार्गेट का केले जात आहे, हा सवाल आहे. या देशात इतर राज्यात कोणी मिळत नाही का? केवळ शिवसेना आणि तृणमूलच मिळत आहे का? हे सरकार पाडण्याचे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या आघाडीच्या सरकारला दबावात आणून त्यांना अस्थिर करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे, पण त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा ईडीचे ४ अधिकारी गजाआड जाणार! संजय राऊतांनी काय केला गौप्यस्फोट?)
फक्त महाराष्ट्र आणि प. बंगालमध्येच धाडी
किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांबाबत बोगस कंपन्यांची लिस्ट दिली, त्यावर काहीच झाले नाही. कोणी ढवंगाळे यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी स्वत: पाठवली. काय झाले? संपूर्ण देशात सर्वाधिक ईडीची चौकशी, कारवाई केवळ महाराष्ट्रात झाली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमधील 7 लोकांवर कारवाई झाली आहे. भाजपच्या नेत्यांवर कोणतीही कारवाई नाही. ते काय हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे का. ही भानामाती काय आहे त्याचा शिवसेना लवकरच खुलासा कणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community