बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत. ते मी पहिल्यापासून बोलत आहे. पीएमसी घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. खंडणीची प्रकरण आहेत. आतापर्यंत ते दाबलेले होते. हळूहळू बाहेर येत आहेत. बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का पळत आहेत? आतापर्यंत पळापळ होत नव्हती. जेव्हापासून मी भ्रष्टाचार बाहेर काढला तेव्हापासून बाप-बेटे दारोदार फिरत आहेत. अटकपूर्व जामिनासाठी या न्यायालयातून त्या न्यायालयात जात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी का अर्ज करत आहात? तुम्ही काहीच केले नाही ना? मग एवढी धावपळ कशासाठी. हे बाप बेटे आणि काही लोक जे मोठमोठ्या गप्पा मारतात. आतापर्यंत इतरांना धमक्या देत होते. याला जेलमध्ये पाठवू त्याला पाठवू. मग तुम्ही जामिनासाठी अर्ज का करत आहात?, असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला.
Mark my words…
I repeat :
"Bap Beta jail jayenge". Period.And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their "Vasuli Agents" will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही
यासंबंधी राणे यांनी ट्विट करून महाराष्ट्र झुकेगा नही, असेही पुष्पा स्टाईल संवाद साधला. आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणात काहीच संबंध नसल्याचे उघड आले आहे. या प्रकरणाचे सत्य बाहेर आले आहे. या प्रकरणात बनाव केला गेला होता. तपास यंत्रणांचा दुरुपयोग नव्हता तर काय होते? असे सांगतनाच आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला गेला आहे. आतापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी समोर आलो आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. आय रिपीट मेक माय वर्ड, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच बाप-बेटे तुरुंगात जाणारच आहेत. तुम्ही घोटाळा केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी का धडपड करत आहात?, असा सवालच राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नाव न घेता केला.
Join Our WhatsApp Community