केंद्रीय तपास यंत्रणांकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही हा त्रास दिला जात आहे. या तपास यंत्रणांना श्रीराम मंदिरासाठी झालेला जमीन घोटाळा हे प्रकरण अतिशय योग्य आहे. त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव संमत करावा, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
सीबीआय, ईडी हे भाजपचे कार्यकर्ते!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी, २५ जून रोजी ईडीने नागपुरात त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवार आणि अनिल देशमुख यांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. सीबीआय, ईडी हे काही भाजपचे कार्यकर्ते आहेत का, अशा प्रकारे या केंद्रीय तपास यंत्रणा बदनामी करत आहे, त्यांची प्रतिमा मलीन करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या घरावर पुन्हा ईडीची छापेमारी )
श्रीराम मंदिर जमीन खरेदीचीही चौकशी करा!
प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात केंद्रीय तपास यंत्रणा विनाकारण त्रास देत आहेत, असे म्हटले आहे. या पत्राचा बारकाईने अभ्यास करावा. असा प्रकारे जर चौकशी करायची असेल तर अयोध्येतील महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी जी श्री राम मंदिराच्या नावाने जमिनी खरेदी केल्या, त्याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांनी करावी, असेही संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community