Sanjay Raut-Prakash Ambedkar : शिवसेना उबाठाचा प्रकाश आंबेडकरांना टोला; आंबेडकरांनी ‘दुखरी नस दाबली’

225
Sanjay Raut-Prakash Ambedkar : शिवसेना उबाठाचा प्रकाश आंबेडकरांना टोला; आंबेडकरांनी ‘दुखरी नस दाबली’

वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या एका विधानवरून शिवसेना ऊबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना खोचक टोला लगावला आणि आम्हाला त्यांच्या विधानाने यातना होत नाहीत, अशा शब्दात रागावर नियंत्रण ठेवणे भाग पाडले. (Sanjay Raut-Prakash Ambedkar)

रामदास आठवले यांचा खरा पक्ष

‘खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे’, असं विधान सोमवारी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी करून शिवसेना उबाठाची ‘दुखरी नस दाबली’. मंगळवारी ६ ऑगस्टला सकाळच्या सत्रात पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याबद्दल विचारले, त्यावेळी बोलताना राऊत आपला राग आवरत म्हणाले की, “जर आम्ही असं म्हणालो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा पक्ष हा रामदास आठवले यांचा पक्ष आहे, तर प्रकाश आंबेडकर यांच्या मनाला किती यातना होतील? आम्हाला काही त्यांच्या विधानाने यातना होत नाहीत. अशा प्रकारची वक्तव्ये येत असतात. आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवावा.” (Sanjay Raut-Prakash Ambedkar)

(हेही वाचा – Malaysia येथे भक्तीमय वातावरणात साजरा झाला संत नामदेव महाराज समाधी महोत्सव)

आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा

तसेच “रामदास आठवले यांचा पक्ष तसा ताकदीचा आहे. अनेक पक्ष आहेत. असे अनेक पक्ष पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे आणि ते नष्ट होतात,” असा टोलाही राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला हाणला. “खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे असे जर प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल तर प्रकाश आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल,” असेही राऊत पुढे म्हणाले.

अधिक बोलणे टाळले

प्रकाश आंबेडकर यांचा राग आला तरी राऊत यांनी रागावर नियंत्रण ठेवत सावध प्रतिक्रिया दिली. कारण आंबेडकर यांच्यावर उघड टीका करणे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उबाठाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही, हे लक्षात आल्याने राऊत यांनी अधिक बोलणे टाळले. (Sanjay Raut-Prakash Ambedkar)

(हेही वाचा – ठाकरेंची दिल्लीवारी सोनिया दर्शनासाठी; Pravin Darekar यांचे टिकास्त्र)

सेनेच्या मतदारांचा शिंदेंवर विश्वास

प्रकाश आंबेडकर सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, “खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची पारंपरिक मतं एकनाथ शिंदेंसोबत आहेत. लोकसभा निवडणुकीतही शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवला. शिवसेनेची मतं शिंदे यांच्या गटाला मिळत आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट वाढल्याचं दिसतं आहे पण हा आरक्षणवादी लोक आणि मुस्लिम मतांमुळे वाढला आहे.” असे प्रकाश आबंडेकर म्हणाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.