सरकारच्या विरोधात चिथावणीखोर बोलणे तसेच पोलिसांची प्रतिमा समाजामध्ये खराब करणे या कारणामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोलतांना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘सरकारमध्ये फक्त फडणवीसच शहाणे आहेत बाकी सर्व अतिशहाणे आहेत’ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका, असे आवाहन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत अधिक आक्रमक झाले. सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस शहाणे आहेत बाकी सर्व अतिशहाणे किंवा मुर्ख आहे, असा टोला त्यांनी लगावला.
(हेही वाचा – Shri Trimbakeshwar Temple : मुसलमानांकडून झालेल्या घुसखोरी घटनेची कडक कारवाई करा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश)
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या सर्व आशा संपल्या आहेत. त्यानंतर ठाकरे गट ते मान्य करत नाही. कारण त्यांना त्यांच्या लोकांना संदेश द्यायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस शहाणे आहेत. बाकी सर्व अतीशहाणे किंवा मुर्ख आहेत. कारण फडणवीस यांना राजकारण माहीत आहे. त्यांना कायदा माहिती आहे. त्यांना प्रशासन माहीत आहे. ते सर्वांच्या संपर्कात आहेत. त्यानंतर त्यांनी असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यांवर दिल्लीतून दबाब आहे, हे स्पष्ट आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
हेही पहा –
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार घटनाबाह्य आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार बेकायदेशीर आहे, हे वक्तव्य मी केले. बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळणे हा गुन्हा आहे. परंतु हे बोलल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सरकार बोलण्याचा हक्का हिरावून घेतोय, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. बेकायदेशीर अधिकाऱ्याचे निर्णय पाळताना अधिकाऱ्यांनी सावध राहिले पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut)
Join Our WhatsApp Community