Sanjay Raut : संजय राऊतांची शरद पवार – प्रफुल्ल पटेल भेटीवर टीका; म्हणाले…

247
Sanjay Raut : संजय राऊतांची शरद पवार - प्रफुल्ल पटेल भेटीवर टीका; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संसदेच्या विशेष अधिवेशनच्या निमित्ताने दिल्लीला गेले होते. संसदेत मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूरही होण्याची शक्यता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाली. त्या दोघांनी एकत्र फोटोही काढला, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढला, हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटवरून  शेअर केला आहे.

(हेही वाचा – Nerul-Uran Railway: खारकोपर ते उरण लोकल दिवाळीपर्यंत सुरु होणार)

या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. “यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत? हे मला माहिती नाही. पण, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत हे मला माहिती आहेत.

शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील फुटीर गटाविरोधात निवडणूक आयोग व न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच, फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.