संजय राऊतांची निवडणूक आयोगाला दिली शिवी; म्हणाले…

92
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवराळ भाषा वापरली आहे. त्यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे संजय राऊत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली जात असताना संजय राऊत यांचा बोलताना तोल जाताना दिसत आहे. संजय राऊत शुक्रवार, ३ मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाषण करताना राऊत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केली. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडू शकतात. संघर्ष करणे हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केले आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिले ते 50 खोके देवून पळून गेले आहेत आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?, असे संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.