डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या विचारांचे खरे वारसदार कोण? याबाबत शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे विधान केले. इतकेच नाही तर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता हे दोघे नेते ‘हस्तक’ असून निवडणुकीत पाडापाडी आणि त्याबदल्यात व्यवहार करणे हे यांचे काम असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
(हेही वाचा- Kolkata Doctor Rape Murder प्रकरणी ममता सरकारला न्यायालयाचा दणका; तपास सीबीआयकडे)
आठवले हेच डॉ आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार
“गेली अनेक वर्षे रामदास आठवले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) विचार जिद्दीने पुढे नेत आहेत. त्यांचे संगळ्यांशी संबंध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने देशात काम करत होते, त्या पद्धतीने आठवले करत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार, शिलेदार आठवले आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात चुकीचे काहीच नाही,” असे विधान शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काढत महाविकास आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असे नवे युद्ध सुरू केल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादी (शप) अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ज्ञानाचा मान राखून बोलावे
राऊत पुढे म्हणाले की, रामदास आठवले (Ramdas Athawale), जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हेसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे खरे वारसदार आणि विचारधारेचे खरे वारसदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर यात चुकीचे काहीच नाही. माणसानं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा मान राखून बोलले पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी आंबेडकर यांना लगावला. (Sanjay Raut)
(हेही वाचा- Pramod Bhagat Suspended : पॅरा ॲथलीट प्रमोद भगतचं १८ महिन्यांसाठी निलंबन)
राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हस्तक?
“आपल्या कृतींमुळे राष्ट्रद्रोही, धर्मांध शक्तींना मदत होत असेल, मग ते कोणीही असतील असे सांगून या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे अशा प्रकारचं हस्तकाचं काम करतात. कधी मोदी-शहांना पाठिंबा तर कधी बेइमान शिंदे गटाला पाठिंबा देतात. या दोन नेत्यांबाबत महाराष्ट्राला विधार करण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत या नेत्यांचे कुणी ऐकले नाही. पाडापाडी करणं आणि त्याबदल्यात व्यवहार करणं, हे या नेत्यांचं काम आहे,” असा थेट आरोप राऊत यांनी प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. (Sanjay Raut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community