संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने ३१ ऑगस्टला अटक केली होती. ईडीच्या PMLA कोर्टात गुरूवारी राऊतांना हजर करण्यात आले होते.

( हेही वाचा : ईडीच्या कोठडीत राऊतांचा श्वास गुदमरतोय)

८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी ६ लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी या प्रकरणी ईडीने मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. लवकरच या प्रकरणाशी संबंधित आणखी काही व्यक्तींची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना ईडी कोठडी मिळावी यासाठी ईडीच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला. संजय राऊत यांच्या विरोधात अनेक पुरावे समोर आल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला.

राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने न्यायालयाकडे १० ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली. कोठडी मागितली होती, पण राऊत यांचे वकील ॲड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांची कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली.

ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांचा युक्तीवाद

प्रवीण राऊत याला पत्रा चाळ प्रकरणी मिळालेला ११२ कोटींच्या रकमेमधील काही रक्कम रोख स्वरुपात मिळाली. तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान प्रविण राऊत याने राऊत परिवाराला पैसे दिलेत. दर महिना २ लाख रुपये प्रविण राऊत हा संजय राऊत यांना देत होता.

काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली होती ती संजय राऊत यांच्या समोर चौकशी दरम्यान सादर केली होती. पैशांच्या बाबतीत ती कागदपत्रे होते, त्याबाबत काहीच माहिती नाही असं राऊत बोलत आहे.

राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते त्याची कागदपत्रे त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहेत.

काही असे कागदपत्रे सापडले आहे, ज्यातून असं दिसतंय की संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यातून खूप मोठ्या रक्कमेचे ट्रान्सॅक्शन झाले आहे. जवळपास १ कोटी ८ लाख रुपये नुकतेच पाठवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here