शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या १० अधिकाऱ्यांच्या पथकाने राऊत यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची चौकशी सुरु केली त्यामुळे राज्यातील राजकरणात खळबळ उडाली आहे. सर्व पक्षीय नेते त्यावर प्रतिक्रिया देत असताना सकाळी साडेसात वाजल्यापासून हे कारवाई सुरु असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र तब्बल ८ तासांनी यावर प्रतिक्रिया दिली. सध्या निर्लज्जपणाचे कारस्थान सुरु आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या कारवाईवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राच्या विरोधात बोलल्यावर मी गप्प बसणार नाही
आता सध्या दडपशाही आणि दमनशाही सुरु आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आता सगळ्यांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. हिंदुत्व शब्द उच्चारण्याची जेव्हा कुणाची हिंमत नव्हती, त्यावेळी हिंदुत्व उच्चारण्याची हिंमत शिवसेनाप्रमुख यांचा सारखा एकमेव मर्द होता. भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला, त्यामुळे त्यांना आपण कोल्हापुराचा जोडा दाखवला. मी बोलणारच, महाराष्ट्राच्या विरोधात बोलल्यावर मी गप्प बसणार नाही, महाराष्ट्राचा अपमान झाला तर त्यावर मुळमुळीत प्रतिक्रिया देतात, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची विचारसरणी नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महिभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व बंड झाले. एकनाथ शिंदे यांचे होमग्राउंड असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. शिवसेनेत झालेल्या या बंडानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे शिष्य असलेले आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी खासदार राजन विचारे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Join Our WhatsApp Community