शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडी घरात दाखल झाल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

148

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी रविवारी पहाटे संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले आहेत. घरात ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय, नितेश राणेंचं टीकास्त्र)

संजय राऊतांचे ट्वीट

रविवारी सकाळी घरात ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तरीही शिवसेना सोडणार नाही…महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, खोटी कारवाई..खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही..मरेन पण शरण जाणार नाही…कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..मी शिवसेनेसाठी लढत राहीन. जय महाराष्ट्र असे ट्वीट संजय राऊतांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले होते. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.