राज ठाकरेंनी केलेल्या भाष्यानंतर आता भोंग्यांवरुन राज्यात वाद सुरु झाला आहे. राज ठाकरेंनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर, आता राज्यभरात मशिदींवरील भोंग्याचे प्रकरण अधिक तीव्र झाले आहे. त्यावरुन आता राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्राला फटकारले आहे. तसेच, त्यांनी भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवा अशी मागणीदेखील केली आहे.
राऊतांनी पंतप्रधानांना केले आवाहन
पत्रकारांशी संवाद साधताना, संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, केंद्राने गोवंश हत्याबंदीचे उदाहरण देत पंतप्रधान मोदींनाही फटकारले. राऊत म्हणाले जसे गोवंश हत्याबंदीसाठी धोरण बनवले, पण काही राज्यांना अपवाद देण्यात आला. तशी दुटप्पीभूमिका न घेता एक राष्ट्रीय धोरण बनवून केंद्राने सर्वच राज्यांना दिलासा द्यावा.
( हेही वाचा: जहांगिरपुरीतील अनधिकृत बांधकामांच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा ‘ब्रेक’ )
आता हे समोर आले आहे
नाना पटोले, एकनाथ खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचे खोटे सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर आले आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचे सांगितल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community