ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप पक्षाच्या एका नेत्याचा व्हिडीओ ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भाजप पक्षाचा एक नेता मद्यधुंद अवस्थेत पोलिसांवर हात उगारत असल्याचं दिसत आहे. त्यावरून ‘पहाटे 3.30,महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे..मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत..हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे.’ अशा आशयाचा मथळा देऊन संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील नेत्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
पहाटे 3.30
महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत?
शेवट पर्यंत पहा.पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही..
कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे..
मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत..हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे.@Dev_Fadnavis… pic.twitter.com/fYQOeyYsdE— Sanjay Raut (@rautsanjay61) April 30, 2023
(हेही वाचा – Maharashtra Day : उद्धव ठाकरे यांनी वाहिली हुतात्मांना आदरांजली)
यावरून आता राजकारण सुरु झाले आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे यांनी महाभारताचा उल्लेख करत, “संजय राऊत (Sanjay Raut) हा महाभारतातला शकुनीमामा आहे!”, असं म्हणाले आहेत. उदया उद्धव ठाकरेंच्या घरात भांडणं झाली तर त्याला जबाबदार संजय राऊतच असणार हे आताच उद्धवजींना सांगून ठेवतो. आम्ही आदित्य ठाकरेबद्दल आणि नाईट लाईफबद्दल अजून माहिती बाहेर काढावी म्हणून काल संजय राऊतने भाजप नेत्याचा एक व्हीडीओ शेअर केलाय,” असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
हेही पहा –
आम्ही संविधान वाचवा ही चळवळ सुरु केली – संजय राऊत
अशातच महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) महाविकास आघाडीनं मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन केलं आहे. आजचा सभेचा दिवस हा आम्ही संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी निवडला असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. देशात संविधानाचे खच्चीकरण चालले आहे, त्यामुळं आम्ही संविधान वाचवा ही चळवळ सुरु केल्याचे राऊत म्हणाले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संविधानावर प्रेम नाही, तर त्यांचे प्रेम मन की बात वर असल्याचे राऊत म्हणाले.
राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे
राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. सरकारला मन आणि हृदय असते तर श्री सेवकाच्या मृत्यूचे प्रकरण लपवले नसते. ज्या प्रकारची चौकशी व्हायला हवी होती ती झाली नाही. सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती असल्याचे राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community