विधिमंडळाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे राऊत सध्या अडचणी आले असून त्यांच्यावर चहूबाजूने टीका केली जात आहे. या विधानावरून राऊतांविरोधात बुधवारीच हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी राऊतांकडे काही तास शिल्लक आहे. कारण हक्कभंगाच्या नोटीसला राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
बुधवारी, १ मार्चला संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांसोबत बोलताना विधिमंडळाला चोरमंडळ असे म्हटले. आणि त्यानंतर याचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले. विधानसभा आणि विधानपरिषद, अशा दोन्ही सभागृहात राऊतांविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्याची मागणी करण्यात आली आणि या दिवशी दोन्ही सभागृहाचे दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले. शिवाय याच दिवशी म्हणजेच बुधवारीच राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावली असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा – संजय राऊत)
या हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी राऊतांकडे आजचाच दिवस आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत राऊतांना उत्तर द्यावे लागणार आहे. या नोटीसद्वारे राऊतांना लेखी खुलासा करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. तसेच उत्तर देण्याबाबत कोणतीही मुदत वाढ मिळणार नसल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community