राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. आतापर्यंत आरोप प्रत्यारोपापर्यंत ठिक होतं, मात्र आता एका नेत्यानं भलतीच भूमिका घेतली आहे. मनसेच्या एका नेत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्याचा मनोरुग्णालयाचा फॉर्म भरलाय.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात, मात्र आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेत. ते नेहमी विरोधकांवर टीका करतात. त्यांनी नुकतंच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याचा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी समाचार घेतला. दरम्यान त्यांच्यावर अनेकांनी मनोरूग्ण असल्याच्या टीकादेखील केल्या होत्या, मात्र आता त्यांचा मनोरुग्णाचा फॉर्म भरला गेला आहे. (Sanjay Raut)
(हेही वाचा – Hardik Pandya Net Worth : मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याची किती आहे संपत्ती ?)
मनसेने भरला संजय राऊतांचा मनोरुग्णाचा फॉर्म
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते गजानन काळे यांनी चक्क संजय राऊत (Sanjay Raut) यांचा मनोरुग्णालयात दाखल करण्याबाबत फॉर्म भरलाय. त्या फॉर्मचा फोटो समोर आला आहे. त्या फॉर्ममध्ये खासदार आणि सामना यांचे हितचिंतक असल्याचं नमूद करण्यात आलं. अर्जासोबत विविध बातम्यांची कात्रणे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आलेल्या सीडी पेन्ड्राईव्ह स्वरूपात देण्यात आल्यात. (Sanjay Raut)
गेट वेल सून संजय राऊत
“संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातील विधान पाहता यांना मनोरुग्णालाय दाखल करणं गरजेच आहे. कधी त्यांना पवारसाहेब या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. कधी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. उद्धवजी पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू शकत नाही? असं बोलतात. मनसेच्या वतीने पुणे येरवडा येथे असलेल्या मनोरुग्णालयात संजय राऊत यांना दाखल करण्यासाठी त्यांचा एडमिशन फॉर्म भरण्यात आला आहे, असं गजानन काळे यांनी म्हटलंय. गेट वेल सून”,असं देखील म्हटलं आहे.
अॅडमिट होऊन पूर्ण बरे होऊन, उपचार घेऊन परत यावे…काळजी घ्या, असं सुद्धा ते म्हणालेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत बेताल वक्तव्य करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. काही दिवसांआधी त्यांनी अमरावतीमध्ये भाषण करत असताना नवनीत राणा यांच्यावर टीका केली. नाची, बबली म्हणत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.
संजय राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू असताना. ते बेताल वक्तव्य करत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp CommunityGet well Soon … !
आदरणीय संजय ऊर्फ ( मनोरुग्ण ) राऊत …आपली काही दिवसातली विधानं पाहता …
आपल्यासाठी येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथील अॅडमिशन फॉर्म भरला आहे … अॅडमिट होऊन योग्य उपचार घेऊनच आणि पूर्ण बरे होऊनच परत यावे …,
काळजी घ्या … !!!माफ करा, आदरणीय… pic.twitter.com/b1oltK5B6b
— Gajanan Kale (@MeGajananKale) April 22, 2024