लोकसभा २०२४ निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (Shiv Sena UBT) गटाला ९ जागा मिळाल्याने हुरळून गेलेल्या प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस (Congress) आणि शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही खडे बोल सुनावले. आज ६ जूनला सकाळच्या सत्रात आयोजित पत्रकार परिषदेत, “शिवसेना उबाठा नसती तर काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का?” असा थेट सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
(हेही वाचा- Tourist Places In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये पाहण्यासारखी ५ प्रमुख ठिकाणे!)
काँग्रेसबाबत इर्षा?
राज्यात शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) २१ जागा लढून केवळ ९ जिंकल्या तर काँग्रेसने १७ लढून १३ वर बाजी मारली आणि राष्ट्रवादी (शप) गटाने १० जागी उमेदवार उभे करून ८ वर विजय मिळवला. उबाठाने सर्वाधिक जागा लढूनही अपेक्षित यश न मिळाल्याची खंत आणि काँग्रेसला अधिक जागा मिळाल्याची इर्षा, राऊत (Sanjay Raut) यांच्या बोलण्यात दिसून येत होती.
काँग्रेसच्या जागा वाढवण्यात उबाठाचे मोठे योगदान
काँग्रेसच्या (Congress) जास्त जागा आल्या तर आता विधानसभेला काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली, असे वाटत नाही का? या प्रश्नावर राऊत उखडले, “तुम्हाला वाटत नाही की काँग्रेसच्या जागा वाढल्या त्यात सगळ्यात मोठे योगदान शिवसेनेचे (उबाठा) आहे? जर शिवसेना नसती किंवा उद्धव ठाकरे फिरले नसते महाराष्ट्रात तर या जागा निवडून येऊ शकल्या असत्या? केवळ काँग्रेस नाही तर जिथे जिथे काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार होते त्या-त्या ठिकाणी शिवसेनेने (उबाठा) (Shiv Sena UBT) प्रचार केला. आम्ही काँग्रेस-पवार असा भेदभाव केला नाही, तर सगळ्या ठिकाणी प्रचार केला,” असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
(हेही वाचा- PM Narendra Modi यांच्या शपथविधिला ‘या’ देशांचे प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित!)
सगळ्यात जास्त काम बारामतीत
शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या जागेवर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांचा विजयदेखील उबाठामुळे झाल्याचा अप्रत्यक्ष दावा करायला राऊत (Sanjay Raut) यांनी मागे-पुढे पहिले नाही. “आम्ही सगळ्यात जास्त काम बारामतीत केले. सगळ्यांना माहीत आहे. मी स्वतः बारामतीत सहा सभा घेतल्या. आमची तिथे मते आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांशी आमचा संवाद सुरू होता. धुळे असो वा अन्य जागा किंवा विदर्भ असो. रामटेक तर आमचीच (सिटींग) जागा आहे,” असे सांगून महाविकास आघाडीत उबाठा मोठा आणि महत्वाचा पक्ष असल्याची जाणीव राऊत यांनी मित्र पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला (शप) करून दिली. (Sanjay Raut)
थोडक्यात, शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) विधानसभेतही आघाडीत सर्वाधिक जागांवर दावा ठोकणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. (Sanjay Raut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community