अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे पाहू, पण तुम्ही शरद पवारांकडे वाऱ्या करून थकले आहात. तुम्ही शरद पवारांचे दलाल आहात. तुम्ही उद्धव ठाकरे यांचे नाव तरी पुढे जोडा, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, अजित पवारांनी काय केले आणि काय नाही केले याकडे संजय राऊत यांच्या सारख्या बिनडोक माणसाने लक्ष देऊ नये. यांची गत ‘ना घर का ना घाट का’, अशी झालेली आहे. यांना महाविकास आघाडीमध्ये कोणी महत्त्व देत नाही, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.
(हेही वाचा Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट)
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुती तसेच महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. यावरून दोन्ही आघाड्यांमध्ये वादही होताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे वृत्त समोर आले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले होते की, अजित पवार हे एकनाथ शिंदेंपेक्षा वरिष्ठ नेते आहेत तसेच त्यांना शिंदेंपेक्षा जास्त बेईमानीचा अनुभव आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महायुतीचीच सत्ता येणार हा आमचा दावा
आगामी विधानसभा निवडणुकीवर बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, महाराष्ट्रात जसे विधानसभेचे वारे वाहत आहे तसे सर्व्हे समोर येत आहेत. बऱ्याच संस्था राजकीय पक्षांना हायर केलेल्या असतात त्यामुळे ते नेत्यांकडून सर्व्हे बनवतात. काल महाविकास आघाडीला विजय मिळणार असे म्हणले असता तो सर्व्हे खरा असेल की नाही हा प्रश्न आहे. हम बने तुम बने असे सर्व्हे बनवले गेले आहेत. नाराजी आणि युती तसेच होणाऱ्या घडामोडींवर होणारा सर्व्हे हा खरा असेल. आमची युती चांगल्या पद्धतीने पार पडेल, गणपती झाल्यावर आमच्या युतीची घोषणा होईल. येणारी सत्ता ही महायुतीची हा आमचा दावा आहे.
Join Our WhatsApp Community