हनुमान जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सर्वच पक्षांनी जय हनुमान म्हणत शक्तिप्रदर्शन करायला सुरुवात केली आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी राज्यातील विविध ठिकाणी हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त हनुमान चालिसेचे पठण आणि महाआरतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. मनसेच्या हनुमान चालिसा पठणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. पण त्यावेळी त्यांचा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.
मनसेला आव्हान देताना अनावधानाने हनुमान चालिसेच्या ऐवजी त्यांनी मारुती स्तोत्र म्हणून दाखवले. पत्रकारांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून देताच राऊतांनी सारवासारव केल्याचं पहायला मिळालं.
(हेही वाचाः आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार, काय आहे तारीख?)
मारुती स्तोत्र की हनुमान चालिसा?
मनसेच्या हनुमान चालिसा पठणावर बोलताना, हनुमान चालिसा म्हणायची होती तर पाठ करुन म्हणायची होती, यांना हनुमान चालिसा सोडा राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् देखील पाठ नाही, अशी टीका राऊतांनी केली. त्यानंतर त्यांनी मारुती स्तोत्राच्या सुरुवातीच्या ओळी म्हणून दाखवत, मी तुम्हाला संपूर्ण हनुमान चालिसा म्हणून दाखवतो तुमच्यात हिंमत आहे का, असे आव्हान केले.
(हेही वाचाः ‘ते’ भोंगे हटणार नाहीत… राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला गृहमंत्र्यांचं उत्तर)
असा उडाला गोंधळ
राऊतांच्या या आव्हानानंतर हनुमान चालिसा सांगत त्यांनी मारुती स्तोत्र म्हटल्याची चूक पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर हनुमान चालिसा असेल किंवा मारुती स्तोत्र आम्ही हनुमान भक्त आहोत, अशी सारवासारव त्यांनी केली. पण त्यांचा उडालेला हा गोंधळ उपस्थितांच्या नजरेतून सुटला नाही.
(हेही वाचाः नका त्रास देऊ त्यांना, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही)
Join Our WhatsApp Community