Sanjay Raut शिवसेना उबाठाची ‘नैया’ बुडवणार?

राऊत यांनी उबाठाचे विरोधी तसेच मित्र पक्षही अंगावर घेतल्याने त्याचा फटका निवडणुकीत त्यांच्या गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

261
Sanjay Raut शिवसेना उबाठाची 'नैया' बुडवणार?

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची सकाळची पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी अडचणची ठरू शकते. राऊत यांनी उबाठाचे विरोधी तसेच मित्र पक्षही अंगावर घेतल्याने त्याचा फटका निवडणुकीत त्यांच्या गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Sanjay Raut)

आंबेडकर यांना टोमणा

शनिवारी सकाळी राऊत (Sanjay Raut) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख घेतले. कल्याणमध्ये उबाठाने कमजोर उमेदवार दिला, असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, आंबेडकरांचा अपमान करत, “आंबेडकर यांनी वंचितचे उमेदवार निवडून आणवेत. यासाठी त्यांना शुभेच्छा. शिवसेनेचे उमेदवार हे सामान्य घरातले असतात आणि ओरिजनल असतात. दुसऱ्यांकडून उमेदवार घेऊन आमचे म्हणून मिरवावे लागत नाहीत,” असा टोमणा मारला. “प्रकाश आंबेडकर असं बोलून त्या महिलेचा अपमान करत असतील तर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे,” अशी पुष्टीही त्यांनी जोडली. (Sanjay Raut)

(हेही वाचा – Indian Army: भारतीय लष्कराच्या विमानाचे तातडीने करावे लागले लँडिंग, कारण काय?)

काँग्रेसशी पंगा

सांगलीत राऊत यांनी काँग्रेसशीदेखील पंगा घेतला. गेले काही दिवस सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी कदम यांनी ‘सांगलीत काँग्रेसच वाघ आहे’ असे विधान केले त्यावर टीका करत, “वाघ आहात तर चंद्रहार पाटील (उबाठाचे उमेदवार) यांना निवडून आणा. त्यांना निवडून आणलत तर तुम्ही खरे वाघ,” असा टोमणा मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर तर रोजच टीका करत असतात. (Sanjay Raut)

निवडणुकीत फटका?

शरद पवार सोडून राऊत यांनी सगळ्याच पक्षांना दुखावले असल्याने त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होताना दिसतो. त्यामुळे शिवसेना उबाठाला यांचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.