सोमय्यांचं जुनं ट्वीट दाखवत राऊतांचा धक्कादायक खुलासा

104

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सध्या जोरात सुरू आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा केलेले 58 कोटी रुपये सोमय्यांनी लाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. पण आता राऊत यांनी याचबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सोमय्यांनी 58 नाही तर 140 कोटी रुपयांची मागणी केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी सोमय्यांचंच एक जुनं ट्वीट शेअर केलं आहे.

(हेही वाचाः ‘मी शरद पवारांचा माणूस आहे’, संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं)

राऊतांचा खुलासा

सोमय्यांचं 2013 मधील एक ट्वीट शेअर करत राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मी 158 कोटींचा हिशोब मागितला होता, पण आता हिशोब 140 करोड रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सगळी गडबड आहे, असं म्हणत राऊतांनी सोमय्यांवर आरोप केला आहे.

मैने तो 58 करोड का हिसाब मांगा था…बात 140 करोड तक पहुंच गयी..
क्रोनोलिजी को समज लिजिये
प्यारे देश भक्तो…
गडबड ही गडबड हैं..

अशा खोचक शब्दांत राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार घणाघात केला आहे.

(हेही वाचाः राऊतांनी शिवसेना सोडली?)

काय आहे राऊतांचा आरोप?

किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सर्वसामांन्यांकडून पैसे उकळले आहेत. हे पैसे राजभवनाकडे सुपूर्द केले जातील, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. पण राजभवनापर्यंत ते पैसे पोहोचले नसल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. ते पैसे किरीट सोमय्या मुलुंडला निलम नगर येथे गेले. या पैशांचं पीएमसी बँकेच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

(हेही वाचाः सोमय्यांचा घणाघात! … म्हणाले जेवढे घोटाळेबाज सापडत आहेत त्या सगळ्यांचा बॉस ‘वांद्र्यात’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.