Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला

82
Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला
Sanjay Raut: हरियाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वासामुळे; राऊतांचा सामनातून टोला

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल (Haryana Aseembly Election Result) जाहीर झाला. हरियाणा विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस (Congress) बॅकफूटवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राची बाजी महाविकास आघाडीच जिंकणार आहे. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील निकालापासून शिकावे असे बरेच काही आहे असे सामनाच्या अग्रलेखातून सुनावण्यात आले आहे. (Sanjay Raut)

(हेही वाचा-Amit Shah: “परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा मिळाला”, अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा)

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरयाणात काँग्रेसचा पराभव फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या अरेरावीमुळे होताना दिसत आहे. हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरयाणात भाजपविरोधी वातावरण होते. भाजपच्या मंत्र्यांना व उमेदवारांना हरयाणातील गावात घुसू देत नाहीत असा माहोल होता. तरीही हरयाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले. (Sanjay Raut)

(हेही वाचा-Indian Army: दोन जवानांचे दहशतवाद्यांकडून अपहरण! एक जवान तावडीतून सुटला)

त्याच वेळी जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बहुमत मिळवले व भाजपच्या स्वप्नाच्या ठिकऱ्या उडवल्या. कश्मीरातील जनता मोदी-शहांनाच मतदान करेल असे ढोल वाजवले जात होते. पाच वर्षांपूर्वी 370 कलम हटवून अमित शहांनी जणू क्रांतिकारक पाऊल टाकल्याचे जाहीर केले. कश्मीरातून 370 कलम हटवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार केल्याचा आव मोदी-शहा आणत होते, पण कश्मीरातील दहशतवाद त्यांना संपवता आला नाही. पंतप्रधान मोदी यांना कश्मीरच्या जनतेने झिडकारले व हरयाणात स्थिती अनुकूल असतानाही काँग्रेसला फायदा घेता आला नाही. काँग्रेसच्या बाबतीत हे नेहमीच घडते. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर येणार नाही असे पक्के वातावरण मागच्यावेळी होते, पण काँग्रेस पक्षाची अंतर्गत सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावर पडली. हरयाणात मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेस पक्षाची नौका डुबवली काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. (Sanjay Raut)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.