मोदींसारख्या तपस्वी माणसाला किमान ८०० जागा मिळाल्या पाहिजे: Sanjay Raut यांचं टीकास्त्र

144
मोदींसारख्या तपस्वी माणसाला किमान ८०० जागा मिळाल्या पाहिजे: Sanjay Raut यांचं टीकास्त्र
मोदींसारख्या तपस्वी माणसाला किमान ८०० जागा मिळाल्या पाहिजे: Sanjay Raut यांचं टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान संपताच (Sanjay Raut ) विविध माध्यमांतून एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर करण्यात आहे. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut )

“अत्यंत फसवणुकीचा हा एक्झिट पोल आहे”

संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले, “एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान केले आहे. मोदींनी साधना केली, तपस्या केली. त्याप्रमाणे 360 आणि 370 जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा तरी मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागले. अत्यंत फसवणुकीचा हा एक्झिट पोल आहे. गेल्या काही वर्षात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष, गृह मंत्रालय आणि यंत्रणा कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे.” (Sanjay Raut )

“एक्झिट पोलवर विश्वास नाही”

“जयराम रमेश यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की, गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 24 तासात किमान 180 जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकावले आहे. जर तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही. धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार आहे. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. मला (Sanjay Raut ) माहीत आहे की महाराष्ट्रात काय होणार आणि देशात काय होणार आहे. कोणी कितीही आकडे लावोत. या देशात एक्झिट पोल बनवणाऱ्या 100 कंपन्या आहेत. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 प्लस जागा मिळवेल.” असं राऊत (Sanjay Raut ) म्हणाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.