सोमय्यांनी ‘विक्रांत’ चे पैसे कुठे ठेवलेत? राऊतांनी सांगितला पत्ता

127

ज्या प्रकारचा आरोप मागच्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्या सरकारवर करत आहे. हा त्या प्रकारे हवेत केला जाणारा आरोप नव्हे. एका रिटायर्ड जनरलनेच्या तक्रार केली आहे. हा जनतेचा पैसा आहे. ईथे सगळ्यांना ईडीच्या धमक्या द्यायच्या आणि परदेशात पैसा जमा करायचा. असा घणाघात संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

सोमय्यांनी कारवाईला सामोरे जावे

आम्ही हवेत काहीही बोलत नाही आणि भ्रम निर्माण करत नाही. तो 11 हजार कोटींचा की 58 कोटींचा घोटाळा आहे, हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही बदल्याच्या भावनेने अशा प्रकारची कारवाई करत नाही. असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच, सोमय्या बेल मिळावी म्हणून जात आहेत. पळत आहेत, गायब झाले आहेत. माझे त्यांना आवाहन आहे की त्यांनी कारवाईला सामोरे जावे. तुम्ही बेल साठी जात आहात. तुम्ही पळता आहात. तुम्ही महात्मा आहात. तुम्ही लोकांना प्रेरणा  दिली आहे. तुम्ही अनेक लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढलेले आहेत. मग आता कायद्यापासून पळू नका. गुन्हेगारांने कायद्याला सामोरे जावे अशा शब्दांत खोचक टीका राऊतांनी केली आहे.  

राऊतांचा घणाघात

आता अनेक प्रकरणे समोर येतील. लोकांना ब्लॅकमेक करुन, ईडीच्या धमक्या देऊन थायलंड बॅंकाॅकमध्ये परदेशात कोणाकडून कोणी आणि किती पैसे जमा केले. सीबीआय धमक्या, तसेच  मोठ्या प्रमाणात धमक्या द्यायच्या आणि मग सौदा करण्यासाठी थायलंडला, बॅंकाॅकला व्यवस्था करायची आणि तिथे पैसे जमा करायचे, तिथे पैसे स्वीकारायचे अशी अनेक प्रकरणे अनेकांची आता बाहेर येणार असल्याचेही राऊतांनी सांगितले.

( हेही वाचा: एसटीतील कंत्राटी भरतीचा निर्णय तूर्तास स्थगित! )

आता भाजपाचीच कंबर मोडणार

आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाहीत. माननीय बाळासाहेब ठाकरे, तसेच पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यावर हे संस्कार आहेत. कोणाच्या कुटुंबापर्यंत जायच नाही आणि कोणाच्या कमरेखाली वार करायचा नाही. आम्ही तो केला नाही. सुरुवात तुम्ही केली आहे. तरी आम्ही संयम बाळगत आहोत. कारण परदेशात कोण  धमक्या देऊन पैसे स्वीकारत होते.  हेसुद्धा आता हळूहळू बाहेर येईल आधी या प्रकरणाचा निकाल लागू द्या. भाजप कमरेखाली वार करते त्यामुळे आता भाजपाचीच कंबर मोडणार आहे, असेही वक्तव्य राऊंतानी यावेळी केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.