Sanjay Raut : मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला संजय राऊतांनी सांगितला

97
Sanjay Raut : मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला संजय राऊतांनी सांगितला
Sanjay Raut : मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला संजय राऊतांनी सांगितला

येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनिती आखल्या जात आहेत. दरम्यान, उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. २०० जागा लढवणार, १०० जागा लढवणार असं काहीही आमच्यात चाललेलं नाही. शिवसेनेला किती जागा? वगैरे प्रश्न नाही. तिन्ही पक्ष आणि पक्षप्रमुख हे संख्येवर बोलतच नाही. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा-आता पाकिस्तानची कुठलीही ‘नापाक’ हरकत India Airforce च्या रेंजमध्ये!)

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले की, “प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा होते आहे. प्रत्येक मतदारसंघाचे पैलू वेगळे असतात. आमची चर्चा मतदारसंघांप्रमाणे होते आहे. आम्ही संख्येचा विचार करत नाही त्यावर गेलो असतो की तुम्ही १०० लढा, तुम्ही ८० लढा हे असं करायचं असतं तर हा तासाभराचा खेळ असतो. आम्हाला भाजपाचा आणि गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. भ्रष्टाचार आणि आर्थिक गटाचा पराभव करायचा आहे. दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल.”

(हेही वाचा-Adali MIDC : सिंधुदुर्गवासीयांसाठी खुशखबर! लवकरच उभारणार नवी एमआयडीसी   )

“२६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घ्यावीच लागेल. निवडणूक लांबणीवर वगैरे काहीही जाणार नाही. व्होट जिहादच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आहेत. पण व्होट जिहाद काय असतो मला सांगा. या देशात देशाचे नागरिक मग तो मुस्लिम असो, जैन, पारशी असो किंवा हिंदू असो तो मतदान करतो. तो मतदार तुम्हाला मतदान करतो ते चालतं का? जर व्होट जिहाद आहे तर मग मुस्लिम महिलांसाठी ट्रिपल तलाकचा कायदा का आणला? इतर समाजाचे लोक तुम्हाला मतं देतात. महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपाला मतदान करतात मग त्याला काय म्हणायचं? गुजराती लोकांचं व्होट जिहाद म्हणणार का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.