Sanjay Raut: कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? राऊतांचा सवाल

150
Sanjay Raut: कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? राऊतांचा सवाल
Sanjay Raut: कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? राऊतांचा सवाल

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (Sanjay Raut) आज पार पडत आहे. यानंतर या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. यातच निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा केली. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? असा सवालच राऊतांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut)

पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना सिक्युरिटी वापरली होती?

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारही बाजूंनी २७ कॅमेरे लागले आहेत. ध्यानामध्ये जो माणूस मग्न असतो तो कॅमेऱ्याकडे पाहत नाही. मात्र, पंतप्रधान मोदी चारही बांजूनी २७ कॅमेरे लावून ध्यानाला बसले आहेत. हा लोकसाधनेचा अपमान आहे. पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती? आणि आता तीन हजार सुरक्षा रक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत.” (Sanjay Raut)

(हेही वाचा –BJP : लोकसभेच्या निकालानंतर भाजपात मोठे फेरबदल होणार  )

“आज निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडत आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोयीच्या तारखा घेतल्या आहेत. राजकारणातील सेलिब्रिटी यांच्या तारखा बघून मुद्दामून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची निवडणूक शेवट ठेवली. ४ जूननंतर चक्र उलटी फिरणार आहे, तेव्हा बघू. कितीही पैशांचा पाऊस पडला तरी देखील महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना यश मिळणार नाही.” असंही राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.