शुक्रवारी झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. “संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक ‘भिकार संपादक’ इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच आहे. असं राज ठाकरे म्हणाले होते. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
(हेही वाचा-Maharashtra Vidhansabha Election 2024: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अजित पवारांच्या आमदारावर गुन्हा दाखल!)
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राज ठाकरे बोलतायत बोलू दे ना. भाजपाच्या (BJP) नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्याला जी भाषा समजते, त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलय. भाषेची शुद्धता स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी, महाराष्ट्राच्या शत्रूसाठी वापरायची. आम्ही ही चाटूगिरी, चमचेगिरी करणारे लोक नाहीत.” (Sanjay Raut)
(हेही वाचा-Assembly Election : महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव पाडण्याचा माओवादी संघटनेचा कट?)
“राज ठाकरे काय बोलले, त्यात मला जायचं नाही. निवडणुका आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे. फडणवीसांच स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाहीतर ईडीची (ED) तलवार आहेच, त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची, काय बोलायचे आणि काय लिहायचे, याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते राज ठाकरे असतील तर मी बाळासाहेबांनी घडवलेलाच संजय राऊत आहे.” असं प्रत्त्युत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community