पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. मात्र उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हडपसरवर दावा करत परस्पर उमेदवारही जाहीर केला. यावर उबाठाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हडपसरचा पेच सुटला नसतानाच अंधारेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने राऊत नाराज झाल्याचे दिसते.
(हेही वाचा-Haryana Election Result 2024 : हरियाणातील महत्त्वाच्या मतदारसंघात काय स्थिती? जाणुन घ्या कोण आघाडीवर?)
या पार्श्वभुमीवर बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सुषमा ताई त्या मीटिंगमध्ये होत्या का? त्यांना फोन करून विचारेन. माझ्या माहितीनुसार कालच्या बैठकीला त्या नव्हत्या. जोपर्यंत जागावाटप फायनल होणार नाही, तोपर्यंत मी आऊट ऑफ लाईन बोलणार नाही. महा विकास आघाडीत कुठेही गैरसमज होईल, असे वक्तव्य मी करणार नाही. मी जबाबदार खासदार आहे.” असे म्हणत संजय राऊत यांनी सुषमा अंधारे यांना टोमणा मारला.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
सुषमा अंधारे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. हडपसरच्या जागेबाबतचा निर्णय झाला आहे. ही जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळणार आहे. आमचे महादेव बाबर येथून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी घोषणा काल सुषमा अंधारे यांनी केली होती. (Sanjay Raut)