पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचाा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम अजून वाढला आहे, न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. या प्रकरणााची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.
( हेही वाचा : चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू )
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होती. यावेळी ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. तर संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी अजून काही लेखी मुद्दे सादर करणार आहेत. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २१ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.
Join Our WhatsApp Community