शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेत शिवसेना भवनात महिनाभराआधी पत्रकार परिषदेत आक्रमकतेने आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना टार्गेट केले होते. मंगळवारी, 8 मार्च रोजी राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत थेट ईडीवर आरोप केली. ईडीचे 4 अधिकारी वसुलीचे काम करत आहेत. ते भाजपासाठी एटीएम मशीन बनले आहेत, त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस त्यांची चौकशी करत असून या प्रकरणी ईडीचे 4 अधिकारी गजाआड जाणार आहेत, असा गोप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
सुमित कुमार नरवरची चौकशी कधी करणार?
सुमित कुमार नरवरच्या नावाचा मागे आपण मागील पत्रकार परिषदेत उल्लेख केला होता. हे व्यक्ती बुलंद शहरातील दूध विकणारी सामान्य आहे, मात्र चार-पाच वर्षांत आठ हजार कोटीचा मालक बनली आहे. आता ती व्यक्ती मलबार हिलमध्ये राहते. ईडीने कोणता चष्मा लावला आहे. जरा आमच्याकडील चष्म्यातूनही पहा. मी त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. दिल्ली महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा पैसा त्याच्याकडे आहे ही माहिती देईल, माझ्याकडे सर्व माहिती आहे. ही भानामती सांगणार. त्यानंतर तुम्ही आमच्यावर रेडही टाकाल. आम्हाला अटक कराल, आम्ही घाबरत नाही, असे राऊत म्हणाले.
(हेही वाचा
- आज दिवसभर धाडी पडत आहेत
- त्यामुळे आम्ही म्हटले आपणही घुसवुया
- शिवसेनेलाही अधिकार आहे घुसनेका घुसानेका
- इन्कम टॅक्सचे रेड सुरु आहे
- इन्कम टॅक्सची भानामती सुरु आहे
- जोवर महापालिका निवडणूक होत नाही तोवर या धाडी पडतील
- सगळया शाखेत धाडी पडतील
- सरकार पाडण्याचे करस्थान आहे
- ईडीला 50 जणांची नावे दिली आहेत. त्यावर काही कारवाई नाही
- किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्र्याचे 100 कंपन्यांची नावे दिली आहेत
- नागपूरच्या एका नेत्याचे 50 कंपन्याची नावे दिली आहेत, त्यावर कारवाई नाही
- मागील पत्रकार परिषदेत दूध विकणार्याचे नाव सांगितले होते रहायला जागा नव्हती तो आज मलबार हिलमध्ये अलिशान घरात राहतेय
- त्याच्यासोबत कोणत्या भाजपच्या नेत्याचे संबंध आहेत, हे सर्व माहीत आहे
- ती माहिती आधी पंतप्रधानांना देणार आहे
- ईडीचे काही अधिकारी भाजपासाठी एटीएम मशीन बनले आहेत.
- ज्यांनी निवडणुकीत 50 उमेदवारांचा खर्च उचलला आहे
- जितेंद्र चंद्रकांत नवलाणी हे ईडीचे वरिष्ठ अधिका-यांसाठी काम करत आहे.
- ईडीचे अधिकारी नवलाणी यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होत आहेत.
- 2017 मध्ये दिवान हौसिंगची चौकशी सुरू झाली आणि त्वरित 7 कोटी खात्यात जमा झाले
- वाधवानीने 15 कोटी दिले
- अविनाश भोसले यांनी 7 कोटी दिले
- गेलार्ड कंपनीने 7 कोटी दिले
- मिरका केमिकलने 10 कोटी
- एचडीआयएल कंपनीने 15 कोटी दिले
- यात भाजपाच्या नेत्यांचा सहभाग आहे
- आज दुपारी आम्ही मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे
- 4 ईडा अधिकार्यांच्या विरोधात खंडणीच्या आरोपाखाली त्यांची चौकशी सुरू झाली आहे
- हे अधिकारी तुरूंगात जाणार आहेत.
- यात भाजपाचे नेतेही सामील आहेत.
- पीएमसी घोटाळ्यातील राकेश वाधवाणीसोबत तुमचे काय संबंध आहेत, असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारला आहे
- त्यांनी विमानतळ येथील 15 एकर जमीन प्रकरणी एमएमआरडीएकडे वारंवार तक्रार करत आहेत. ते सिरीयल कम्प्लेनर आहेत.
- त्यांनी एकाही केंद्रीय यंत्रणेकडे केली नाही
- 2016 पासून अचानक तक्रारी बंद केल्या
- त्यावेळी नील सोमय्या निकाॉम इन्फ्रामे पार्टनर बनले
- वसईत इमारत उभी होऊ लागली आहे
- वाधवानला ब्लॉकमेल करून सोमय्या यांनी वाधवानकडून जमीन हडपली आहे
- आज ना उद्या तक्रार होईल आणि सोमय्या पिता-पूत्र दोघेही तुरूंगात जाणार आहे
- तुम्हाला वारंवार पत्रकार परिषदेला यावे लागणार आहे
- पुढच्या पत्रकार परिषदेत अधिकार्यांची नावे जाहीर करणार
- तुम्ही शिवसेना आणि मुख्यमंत्री यांचे बाल बाका करू शकत नाही
- अरविंद भोसले यांनी तक्रार केली आहे, त्यामुळे ईडीचे तीन अधिकारी गजाआड असतील
- मुंबई पोलिसांना केंद्रीय अधिका-यांना चौकशीला बोलावण्याचा अधिकार आहे
Join Our WhatsApp Community