राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांना महाविकास आघाडीने २०२४ च्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत प्रश्न विचारला असता यावर त्यांनी सूचन विधान केले. ते म्हणाले, “आम्ही एकत्र लढणार याविषयी बोलायचे झाले तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे, पण केवळ इच्छा पुरेशी नाही. जागांचे वाटप त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलेली नाही त्यामुळे यावर कसं सांगता येईल.” यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली.
( हेही वाचा : सुदानमध्ये परिस्थिती गंभीर! भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची विशेष योजना )
काय म्हणाले संजय राऊत?
यावर संजय राऊतांना पत्रकार परिषदेत प्रश्न केला असता त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून वेगळा अर्थ काढला जातो. याक्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत स्थितीत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेत आहोत आम्ही एकत्र आहोत हे त्या सभांमधून कळते. १ मे रोजी मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. या सभेला वरिष्ठ नेते उपस्थित राहतील असे संजय राऊत म्हणाले.
( हेही वाचा : अवकाळीचे संकट! विदर्भासह मराठवाड्यात गारपीटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?)
“त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी…”
तसेच महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सगळे इथेच आहोत. तिघे एकत्र राहिलो तर २०२४ साली आपण भाजपचा पराभव करू, लोकसभाही जिंकू ही शरद पवारांची भूमिका आहे असेही राऊत म्हणाले. माझे थोड्यावेळापूर्वी त्यांच्याशी बोलणे झाले त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी असे मला कधी वाटले नाही असेही राऊत यांनी सांगितले.
( हेही वाचा : महापालिकेचे विद्यार्थी शाळांच्या गच्चीवर करणार शेती, पिकवलेली भाजी वापरणार मध्यान्ह भोजनात )
Join Our WhatsApp Community