एकनाथ शिंदे यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे नव्हते, त्यामुळे राज ठाकरे यांच्या शिवसेना सोडण्याच्या मुद्द्यावर शिंदे यांनी केलेली वक्तव्ये धादांत खोटी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून बाजूला केले, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत. त्यांना २५ वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेच उघडे नव्हते, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
(हेही वाचा – Mamata Banerjee यांनी बलात्कारित पीडितांसाठी बनवले रेट कार्ड; बंगालमधील पीडित डॉक्टरच्या वकिलाचा गंभीर आरोप)
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ज्यावेळी राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही तिथे होतो, आम्हाला तिथे काय घडले याची सविस्तर माहिती आहे. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला त्यावेळी एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) ठाण्याच्या पलीकडे काहीही मजल नव्हती. त्यांची मुंबईत फार दौड नव्हती. ठाण्यात पण एखादा महापालिकेचा वॉर्ड पर्यंत त्यांची मजल होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्या काळात त्यांना मातोश्रीवर दरवाजेच उघडे नव्हते, त्यावेळी मातोश्रीवर काय घडले माहिती शिंदेंना नाही. या घटनेचे आम्ही तिथे साक्षीदार होतो. मातोश्रीवर नेमके काय घडलं याची माहिती आम्हाला आहे, शिंदेंना नाही असेही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सध्या ज्यांच्या नादाला लागले आहेत, ते सर्वजण खोटारडे, ढोंगी आणि खोटे बोलणारे लोक आहेत. शिंदे आता त्यांच्या कळपात शिरले आहेत. आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार ? ते खोटंच बोलणार, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community