राज्यसभा निवडणुकीच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर राऊतांनी गद्दारी करणाऱ्या आमदारांना फटकारले. दरम्यान शिवसेनेला मत न टाकलेल्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केले आहेत. त्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला आहे. इतकेच नाही तर राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या ६ अपक्ष/अन्य आमदारांची नावे जाहीर केली. हा गोपनीयतेचा भंग नाही का?, असा सवालही निवडणूक आयोगाला केला आहे.
(हेही वाचा – …तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, राऊतांचा हल्लाबोल)
आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष देण्याची विनंती
तसेच सोमय्यांनी हा सवाल करत निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. पुढे ते म्हणाले, राऊतांना शिवसेनेला मत न दिलेल्या आमदारांची नावे कशी कळाली? तुम्ही सहा आमदारांची नावे कशी आणि का घेतली? ते तुमच्या स्वप्नात आले होते का? असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेकडून आता निवडणुकांची माफियागिरी होत आहे, त्यांनी आमदारांची नावे कोणत्या आधारे घेतले आहेत? असे प्रश्न सोमय्यांनी माध्यमांसमोर शिवसेनेसह राऊतांना विचारले आहेत.
#Shivsena #SanjayRaut disclosing Names of 6 Independent/Other MLA's who voted for BJP in Rajyasabha Election. Is it not Violation of SECRECY?
Request #ElectionCommission to take Note of Violation of Election Code of Conduct @ECISVEEP @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/0PuQTVbV0R
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 12, 2022
राऊतांनी भाजपला डिवचलं
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली त्या सहा अपक्ष आमदारांची नावे आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. संजय पवारांचा पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आणि राऊतांनी गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करून टाकली आहेत. “घोड्यांना चने टाकले की ते कुठेही जाऊ शकतात.” अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आज भाजपवर जाहीर टीका करताना राऊत म्हणाले की, “आमच्या हातात दोन दिवस ईडी द्या, त्यानंतर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील.” अशी टीका करत राऊतांनी भाजपला डिवचलं होतं.
Join Our WhatsApp Community