उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. भाजपमध्ये अनेक गुलाम आहेत. यामध्ये आणखी एका गुलामाची भर पडली. एवढ्या सभा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर आज पक्ष राहिला असता. असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. (Sanjay Raut)
नाशिकची जागा महत्त्वाची आहे
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “नाशिकमध्ये फक्त भाषण होत नाहीत. तर लोकांशी संवाद होत आहे. निवडणुकीची यंत्रणा आहे. या यंत्रणेला गती द्यावी लागत आहे. नाशिकची जागा महत्त्वाची आहे. शिवसेना सातत्याने ही जागा जिंकत आहे. आमच्या आधीच्या खासदाराने प्रलोभनाला बळी पडून गद्दारी केली. बेईमानी विरुद्ध सचोटी अशी ही लढाई आहे. विजयाची परंपरा कायम राहणार नाही तर शिवसेनेच्या वाट्याला जे मताधिक्य आलं त्यापेक्षा विक्रमी मताधिक्याने शिवसेना विजयी होईल. महाविकास आघाडीला संपूर्ण चित्र अनुकूल आहे.” (Sanjay Raut)
रावेरमध्ये चमत्कार होणार
“काल प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) नंदूरबारला होत्या. इंदिरा गांधींचं ज्या पद्धतीने स्वागत व्हायचं तसंच त्यांचं स्वागत झालं. महाविकास आघाडी धुळ्याची जागा जिंकणार आहे. यावेळी रावेरमध्ये चमत्कार होणार आहे. लोक आता उमेदवार बघत नाही. मोदी नको, मोदी हटाव, देश बचाव ही घोषणा गावागावात गेलीय. ग्रामीण भागात ही घोषणा झाली आहे. महायुतीच्या लोकांना गावात घुसू देत नाहीत. लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे.” असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community