अजितदादांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकावे, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीतच आहेत!

५५ ला आपला मुख्यमंत्री होतो, तसे पिंपरी-चिंचवडमध्ये ४०-४४ मध्ये नगरसेवकांमध्ये महापौर शिवसेनेचा व्हावा.

97

भोसरीतून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. भोसरीने जरा हात दिला असता तर आज आढळराव खासदार असते. पिंपरी-चिंचवडचे निकाल असे लागायला हवेत की, कुणाचे कितीही आकडे आले, तरी महापौर आपलाच बनला पाहिजे! ५५ ला आपला मुख्यमंत्री होतो, तसे पिंपरी-चिंचवडमध्ये ४०-४४ मध्ये नगरसेवकांमध्ये महापौर शिवसेनेचा व्हावा. महाआघाडी आहे. सगळ्यांना थोडे थोडे मिळाले पाहिजे. अजित दादाही मुख्यमंत्री यांचे ऐकतात, नाही तर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेतच, असा मिश्किल टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी हाणला. पुण्यात शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

…तर सर्व जागांवर निवडणूक लढू!

मुख्यमंत्री दिल्लीत गेले, या वाक्याचा चुकीचा अर्थ काढू नका. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत, कारण उद्या दिल्लीतील सत्ता आपल्याला काबीज करायची आहे. त्यामुळे अजितदादांना सांगू की, जरा आमच्या लोकांचेही ऐका. नाराज करू नका, असेही राऊत म्हणाले. इतकी वर्षे आपण बोलतोय ‘शिवसेना घराघरात पोहचली पाहिजे’, पण अजून का पोहचली नाही, महापालिका निवडणूक आली कि आपल्या फुग्यातील हवा का निघून जाते? बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला आहे, पण भोसरीतून एकही नगरसेवक शिवसेनेचा निवडून येऊ नये, ही खंत वाटली पाहिजे. आपण सर्व जागांवर लढू, तशी तयारी करू. आलात तर तुमच्या सोबत अन्यथा तुमच्याशिवाय, पण स्वाभिमान सोडून भगव्याशी तडजोड करायची नाही. आदित्य शिरोडकर शाखाशाखांत जातील, सचिन अहिर पुण्यात वारंवार येऊ लागतील, असेही संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा : संजय राऊत पुन्हा पुण्यात! भाजपा ‘ते’ आव्हान स्वीकारणार का?)

दिल्लीत नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात!

आदित्य शिरोडकर तरुण नेते आहेत, त्यांच्यावर पुण्याची जबाबदारी आहे. त्यांना दोन्ही बाजूच्या गमती जमती ठाऊक आहेत. पक्षाची जबाबदारी पुढच्या पुढच्या पिढीकडे सोपवली पाहिजे, नाहीतर पक्षाचे डबके होईल आणि त्यात बेडूक राहतात. बाळासाहेबांनी ज्यांना चेहरा नाही, ओळख नाही त्यांना आमदार, खासदार, मंत्री बनवले. शिवसेना नावाची पाटी बाळासाहेबांनी बनवली नसती, तर काहीच घडले नसते. मी माझा दिल्लीचा पत्ता सांगतांना मी म्हणतो ‘नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात.’ कारण देशात मलाही ओळखतात. मामा वरळकर नावाचे खासदार पूर्वी असेच सांगायचे की, जवाहरलाल माझ्या समोर राहतो, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.