‘धनुष्यबाण शिवसेनेचेच, कुठेही जाणार नाही’ संजय राऊतांचे विधान

125

शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. त्यानुसार हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा यावर भाष्य करत, धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहिल. शिवसेना पक्षाला काहीही होणार नाही, काही जण सोडून गेलेत, मात्र इतर ठिकाणची शिवसेना, नगरसेवक, पदाधिकारी आहेत तिथेच आहेत. सध्या उठलेली ही काही दिवसांचीच वावटळ आहे. ती निघून जाईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेनेचे पक्ष संघटन वाढवण्याच्या उद्देशाने संजय राऊत सध्या नाशिक दौ-यावर आहेत. शनिवारी शिवसैनिकांचा मोठा मेळावा येथे आयोजित करण्यात आला आहे.

( हेही वाचा: संजय राऊत यांचे सूचक ट्वीट; “गमावण्यासारखं काही नसतं तेव्हा कमवण्यासारखं खूप काही असतं” )

ग्रामीण भागात दौरे

ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली पालिकेतील बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याच्या बातम्या येत आहेत. ठाणे महापालिकेत तर शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांपैकी फक्त एकच नगसेवक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिला आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या संपर्कात असून, शहरातील शिवसेनाही जागेवरच आहे, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. राऊत यांनी नाशिकच्या ग्रामीण भागात दौरे केले असून, शनिवारी शहरातील शिवसेना पदाधिका-यांसाठी मेळावा आयोजित करणयात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.