मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. एकीकडे भाजपने आमच्या मागे ईडी लावली, असा आरोप शिवसेनेतून स्वतः राऊतांपासून अनेक नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते तुमच्या कारनाम्यामुळे तुम्ही गोत्यात येत असल्याचे, म्हणत आहेत. या सा-या घडामोडी देशातील एका राज्याएवढे मोठे बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी आहे. आता ही पालिका आमच्याविरोधात कट कारस्थाने करणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून जिंकू, असा दावा राऊत यांनी केला आहे.
भेंटींविषयी फार बोलण्याची गरज नाही
तुम्ही कितीही कारनामे करा. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. आम्ही मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक जिंकूच असा इशारा त्यांनी दिला. शिवाय ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढू आणि जिंकू असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला, तर गोव्यात, पाच राज्यांत, पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा. मात्र, अनेक गाठीभेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात. अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही.
( हेही वाचा: नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या भेटीचे सांगितले कारण, म्हणाले …)
पवारांशिवाय पर्याय नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय नाही. त्यांच्याशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही, असा दावाही राऊतांनी यावेळी केला.
Join Our WhatsApp Community