Sanjay Raut : ‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे’, संजय राऊत यांचा अजित पवार यांना टोला

आम्ही काय भोगतो आहोत हे आमचं आम्हाला माहिती. आम्ही सर्व प्रकारचा त्रास सहन करुनही मूळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहोत.

154
Sanjay Raut : 'धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे', संजय राऊत यांचा अजित पवार यांना टोला

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत थुंकले असा आरोप केला जात आहे.याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला दिल्याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. ‘धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं’ असं म्हणत राऊत यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या संतापही व्यक्त केला.

(हेही वाचा – Keshav Upadhyay : महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का?; केशव उपाध्ये यांचा परखड सवाल)

‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. आम्ही काय भोगतो आहोत हे आमचं आम्हाला माहिती. आम्ही सर्व प्रकारचा त्रास सहन करुनही मूळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहोत. आम्हालाही अनेक प्रलोभणं,दबाव आले. त्रास दिला गेला. पण आम्ही मागे हटलो नाही.आम्ही कधीही भाजपशी सलगी करायला गेलो नाही. आमच्या मनात तो विचारही येत नाही,अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

मी सावरकरांचा भक्त म्हणत थंकण्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न

मी (Sanjay Raut) वीर सावरकरांचा भक्त आहे. एकदा वीर सावरकरांना न्यायालयात आणलं होतं. त्यावेळी त्यांची माहिती देणारा बेईमान त्या न्यायालयाच्या कोपऱ्यात उभा असल्याचे त्यांनी पाहिलं. वीर सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले. याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदूत्व याचा एक भाग आहे. संताप व्यक्त करणं आहे. पण मी कोणावरही थुंकलो नाही, पण वीर सावरकरांनी देखील आपला संताप हा बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकून व्यक्त केला होता.

हेही पहा – 

“शिंदे गटातील लोक बेईमान आहेत. त्यामुळे लोकंच त्यांना जोडे मारत आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहात आहेत,असे सांगतानाच माझ्या जिभेला दात लागला. त्यामुळे मला थुंकण्यासारखी कृती करावी लहरी; मात्र या बिंडोक लोकांना असे वाटते की,लोक आपल्यावरच थुंकत आहेत. त्यांना स्वप्नातही वाटते की, लोक आपल्याला जोडे मारत आहेत. जर थुंकण्यावरुनच माफी मागायची असेल तर देशातील १३० कोटी जनतेलाच माफी मागावी लागेल. कारण, लोक दररोज कोठे ना कोठे थुंकत असतात,असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.