एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांविरोधात आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर दगडफेक वगैरे करण्यात येत असतानाच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना राऊत यांनी या आमदारांवर निशाणा साधला आहे. या बंडखोर आमदारांचे 20 ते 25 बाप आहेत, अशा शब्दांत त्यांनी आमदारांवर टीका केली आहे.
त्यांचे 20-25 बाप आहेत
या बंडखोर आमदारांना एक बाप नाही. त्यांचे दिल्लीमध्ये चार बापर आहेत, गुजरातला गेले होते तिथे तीन बाप पाहिले, गुवाहटीत अजून दोन बाप पाहिले आणि मुंबईत भाजपचे अजून काही बाप तयार झाले आहेत, असे 20-25 बापांचे त्यांना मराठीत अक्करमाशे म्हणतात. आणि अक्करमाशांना समाजात प्रतिष्ठा नसते, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
ही शिवसेना कशी हायजॅक करणार?
हजारो शिवसैनिक असे आहेत ज्यांना वर्षानुवर्ष काही मिळालं नाही पण त्यांनी हातातला भगवा झेंडा कधी सोडला नाही. या शिवसैनिकांना तुम्ही कसं विकत घेणार आहात, ही शिवसेना तुम्ही कशी हायजॅक करणार आहात?, असे सवाल संजय राऊत यांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community