संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा; Ashish Shelar यांची मागणी

50
संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा; Ashish Shelar यांची मागणी
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठाचे नेते, युवा सेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून बुधवारी जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरूवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्याचवेळी त्यांनी ठाकरे सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी केली.

(हेही वाचा – Fraud : हाफकिनमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली २ जणांची फसवणूक; महिलेवर गुन्हा दाखल)

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही चोख प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेले असल्याने महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तीला रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या कार्यकारी संपादक पदी ठेऊ नये. इतकेच नव्हे तर त्यांनाही राज्यसभेच्या सदस्यपदी राहण्याचा अधिकारच नसून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही आ. शेलार (Ashish Shelar)  यांनी केली.

(हेही वाचा – Sanjay Raut यांच्या पोस्टवर त्यांचीच प्रकरणे चव्हाट्यावर)

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असताना जी कामे केली ती निकृष्टच दर्जाची आहेत. त्यांनी जाहीर केलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्प वेळेत पुर्ण होऊ न शकल्याने महानगरपालिकेचे हजारो कोटी रुपये खर्च करुन पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ते उभी करु शकले नाहीत. गेल्या एक दोन वर्षांच्या कामावर कालची परिस्थिती उद्भवली नाही तर गेल्या पंचवीस वर्षांतील निकृष्ट दर्जाचीच कामे त्याला जबाबदार आहेत, असा थेट गंभीर आरोप करत जगविख्यात डॉ. अमरापूकर यांचा जो गटारात पडून मृत्यू झाला त्याचे आधी पापक्षालन करा, असा खोचक सल्लाही शेलार (Ashish Shelar) यांनी दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.