“संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल” ; CM Devendra Fadnavis यांची टीका

"संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल" ; CM Devendra Fadnavis यांची टीका

82
"संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल" ; CM Devendra Fadnavis यांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना फडणवीसांनी खासदार संजय राऊतांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी नागपूरमध्ये दंगल घडवण्यात आली होती का, या संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या शंकेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी आता स्वत:चा तपास करून घेण्याची आवश्यकता आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-“लाडकी बहीणमुळे विकासाची गती कमी झाली आहे का?” CM Devendra Fadnavis म्हणाले …

“अनेक चांगली मनोरुग्णालये आता तयार झाली आहेत. आवश्यकता असेल तर त्याचा खर्च आम्ही सरकारच्यावतीने करू. अगदीच आवश्यकता भासली तर सिंगापूरचं रुग्णालय चांगलं आहे, असं मला कुणीतरी सांगितलंय. तिथे त्यांना पाठवायचं असेल तर त्याचाही खर्च सरकार देईल, हे मी आजच जाहीर करतो. गरज असेल तर बजेटमध्ये त्याची तरतूद करतो.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावेळी फडणवीसांनी नाही असं म्हणत थेट उत्तर दिलं. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महायुतीतसोबत घेणार का? असा सवालही विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंच्यासंबंधात आजतरी निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय ते घेत असतात. त्या त्यावेळी विचार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.