Sanjay Raut ED Raid : बाळासाहेब ठाकरेंची शपथ न घेता पवारांची शपथ घ्या, रामदास कदमांचा राऊतांना टोला

189

संजय राऊत यांच्या घरावर रविवारी सकाळी ईडीने धाड टाकली आहे, ईडीच्या कारवाईवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास आता सुरूवात झालेली आहे. जर पत्राचाळ प्रकरणात त्यांनी काही चुकीचे केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही ते माझेही चांगले मित्र आहेत पण बाळासाहेब ठाकरेंची शपथ न घेता त्यांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती असा टोला रामदास कदमांनी राऊतांना लगावला आहे.

( हेही वाचा : Sanjay Raut ED Raid : पापाचा घडा भरला की फुटतोच, नवनीत राणांचा राऊतांवर हल्लाबोल)

स्वार्थ साधला, आमदारांना वाऱ्यावर सोडले

महाविकास आघाडी सरकारचा उदय होण्यास राऊत सर्वाधिक जबाबदार आहेत त्यांना राष्ट्रवादी विशेषत: शरद पवार यांच्यासोबत युती करण्यात जास्त रुची होती. मी त्याला कायम विरोध केला. शिवसेनेची भाजप सोबत युती व्हावी अशी माझी भूमिका होती असे रामदास कदमांनी सांगितले आहे. त्यांनी स्वार्थ साधला, आमदारांना वाऱ्यावर सोडले उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेत महाविकास आघाडीची जुळवाजुळव केली अशी खोचक टीका रामदास कदमांनी राऊतांवर केली आहे.

अन्याय होताना रोखठोक भूमिका का मांडली नाही

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा सर्वात कमी निधी हा सेनेच्या आमदारांना दिला होता. सर्वाधिक निधी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांना आणि शिवसेनेच्या आमदारांना फक्त १७ टक्के निधी हा कोणता न्याय, जर शिवसेनेबद्दल एवढे प्रेम होते तर आमदारांवर अन्याय होताना त्यांनी आपली रोखठोक भूमिका का मांडली नाही असा सवाल रामदास कदमांनी संजय राऊतांना केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.