संजय राऊतांनी आपल्या पक्षाची काळजी करावी; Pravin Darekar यांचे प्रत्युत्तर

212
Union Budget 2025 : सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भाष्य केले आहे. त्यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. (Pravin Darekar)

दरेकर म्हणाले की, ४ जूननंतर संजय राऊत यांचे थोबाड फुटलेले दिसेल. योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितले आहे. मोदी-योगी असे चित्र उभे करू नका. संजय राऊत आपल्या पक्षाची, घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ठ झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करताहेत. (Pravin Darekar)

(हेही वाचा – Cyclone Remal चा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाची सुसज्जता)

दरेकर पुढे म्हणाले की, सामन्याच्या दाव्याला आम्ही काडीमात्र किंमत देत नाही. गडकरी त्यांच्याबाबतीतले वक्तव्य म्हणजे संजय राऊत यांचा मूर्खपणाचा कळस आहे. प्रचारात राज्यभर व्यस्त असतानाही देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिलेय हे नागपूरवासियांना माहित आहे. संजय राऊत यांचे दुटप्पी बोलणे आहे. अगोदर बोलायचे विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचे प्रचारात उतरले. संजय राऊत नेमके टीका करतानाही काय बोलायचे हे निश्चित करून घ्या, असा टोलाही दरेकरांनी लगावला. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.