राऊतांची निष्ठा उद्धव ठाकरे की शरद पवारांच्या चरणी?

82
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत हे नक्की कुणाचे? शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे की शरद पवार यांचे असे प्रश्न विचारले जात असतानाच राऊत यांनी थेट बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना समज देऊन आपण शरद पवार यांचावरील टीका सहन करू शकणार नाही, असा दाखलाच दिला. एवढेच नाही तर प्रकाश आंबेडकर यांना समज देताना राऊत हे पुरते विसरून गेले की, आपण पक्षप्रमुख नाही तर खासदार व मुखु प्रवक्ते आहोत ते. मात्र प्रकाश आंबेडकर यांना समज देत राऊत यांनी आपणच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख असल्याचे दाखवून दिले.
शिवसेने सोबत युती केल्यानंतर बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आमची युती ही शिवसेनेशी असून महाविकास आघाडीशी नाही, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांना शरद पवार भाजपचे आहेत,असा आरोप करत काही लोक डावीकडे बोलतात आणि उजवीकडे डोळा मारता. अशा लोकांशी आम्ही युती करत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे प्रमुख पवार साहेबांबद्दल आदराने बोलावं. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही,असा इशाराच  आंबेडकर यांना दिला. आव्हाड यांच्यानंतर शिवसेना खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार हे देशासह महाराष्ट्राचे एक उत्तुंग नेते आहेत. ते भाजपचे आहेत, असे म्हणणे हे त्यांच्या आतापर्यंतच्या कारर्किदला मोठा आरोप आहे. जर ते भाजपचे असते, तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपचे सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मविआचे सरकार येऊ दिले नसते.
विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो तेव्हा शरद पवारांचे नाव प्रामुख्याने घेतो. समस्त विरोधी पक्षांना एकत्र करायचे काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकरांनी जरा जपून शब्द वापरावे.’’असे राऊत यांनी म्हटले आहे.  प्रकाश आंबेडकर हे बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख असून  त्यांना अशाप्रकारे समज देण्याची प्रयत्न राऊत यांनी केल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याचे अधिकार नाही.  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलू शकतात, पण राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना समज द्यावी हे योग्य नाही. राऊत हे काही पक्ष प्रमुख नसून त्यांना आपण मुख्य प्रवक्ते आहे याचा विसर पडला का,असाही प्रश्न वंचितच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. जी भूमिका आव्हाड मांडतात, तीच भूमिका राऊत मांडतात, हे पाहता राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणि त्यांची निष्ठा पवार यांच्या चरणी आहे की उद्धव ठाकरे यांच्या चरणी आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.