रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे कोण आहेत? अशी विचारणा केली, असे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. राऊतांनी हा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानावर उपहासात्मकपणे त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.
( हेही वाचा: महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयांना सील )
काय म्हणाले संजय राऊत?
राऊत म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लंडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा झाली. उद्धव ठाकरे कोण आहेत? या माणसाची कमाल आहे. इतकी संकटे आली तरी ते हार मानत नाहीत, असे ते म्हणत होते. उद्या युद्धाची स्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. जो बायडन पुतीन यांना उद्धव ठाकरे कोण आहेत, असे विचारत होते. ते म्हणत होते मोदींना विचारा, त्यांनी अजून आपली भेट का करुन दिली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील उद्धव ठाकरे कोण आहेत? असे विचारत होते, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानानंतर, आता त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
Join Our WhatsApp Community