राऊतांची हितेंद्र ठाकूरांवर स्तुतीसुमने, राज्यसभेत ठाकूरांच्या बविआचा मविआला होणार फायदा?

153

10 जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा संजय राऊत यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे आता बहुजन विकास आघाडी राज्यसभेसाठी शिवसेनेच्या पारड्यात मत टाकणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

(हेही वाचाः राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे ऐकूण व्हाल थक्क)

आमचा संपर्क सुरू आहे

हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्या परिवारातील आहेत. हितेंद्र ठाकूर हे मनमोकळ्या स्वभावाचे नेते आहेत. जे असेल ते परखड आणि स्पष्ट बोलणं हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या भागातील विकास कामांबाबत त्यांचा आग्रह असतो. राज्यसभा निवडणुकीसाठी आमचा त्यांच्याशी संपर्क सुरू आहे, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता बहुजन विकास आघाडी पक्ष महाविकास आघाडीसाठी फायद्याचा ठरू शकतो का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

(हेही वाचाः Rajya Sabha Election : हितेंद्र ठाकूर बनणार गेम चेंजर?)

बविआ वचपा काढणार?

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार राज्य विधानसभेत आहेत त्यामुळे हितेंद्र ठाकूर हे राज्यसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरू शकतात असे म्हटले जात आहे. पण त्यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा येथून बविआचे उमेदवार क्षितिज ठाकूर उभे राहिले होते, त्यांच्या विरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मांना उमेदवारी देऊन ही लढाई चुरशीची केली होती. त्यामुळे आता याचाच वचपा बविआ राज्यसभेच्या निवडणुकीत काढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.