‘मी शरद पवारांचा माणूस आहे’, संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं

137

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर गुरुवारी संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. मी शरद पवार यांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मी शरद पवारांचा माणूस

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचे माणूस असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. मी शरद पवार यांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का?, माझे आणि शरद पवार यांचे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत, त्यामुळेच आम्ही राज्यात महाविकास आघाडी सरकार आणू शकलो, माझ्यासाठी शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले, यातून आमचे संबंध चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

(हेही वाचाः ‘बाळासाहेब असते तर उभं केलं नसतं’, राऊतांच्या जंगी स्वागतावर खासदाराची प्रतिक्रिया)

तुम्ही मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहात

महाराष्ट्रात भाजपविरुद्ध एक चीड निर्माण झाली आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात घोटाळा करुन लोकांचे पैसे भाजप नेत्यांनी लाटले आहेत. तपास यंत्रणांचा शिखंडीप्रमाणे वापर करुन, कारवाया करू नका. अशा कारवाया करुन आम्ही तुम्हाला शरण असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहात, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

सोमय्यांचा भ्रष्टाचार

किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सर्वसामांन्यांकडून पैसे उकळले आहेत. हे पैसे राजभवनाकडे सुपूर्द केले जातील, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. पण राजभवनापर्यंत ते पैसे पोहोचले नसल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. ते पैसे किरीट सोमय्या मुलुंडला निलम नगर येथे गेले. या पैशांचं पीएमसी बँकेच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

(हेही वाचाः गुंड मारणेचेही असेच स्वागत झाले होते! राऊतांच्या शक्तीप्रदर्शनावर भाजपची खोचक टीका )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.