लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वच पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरु आहे. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांची जीभ घसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले होते. यावर बोलताना राऊतांनी (Sanjay Raut) म्हटले की, नरेंद्र मोदी हे गौतम अदाणी आणि मुकेश अंबानींचं नाव घेऊन काँग्रेसवर आरोप करत आहेत. हेच मोदी आता त्यांच्या स्वतःच्या अर्थ दात्यांवर हल्ला करू लागले आहेत. (Sanjay Raut)
(हेही वाचा –Devendra Fadnavis: पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील: फडणवीसांचा पलटवार)
अदाणी आणि अंबानींना अटक करावी असं सांगतानाच राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “अदाणी आणि अंबानी यांनी भ्रष्टाचाराचा पैसा काँग्रेसकडे वळवलाय असं मोदी सांगतात, पंतप्रधान म्हणत आहेत की, या दोन उद्योगपतींचा काळा पैसा काँग्रेस या निवडणुकीत वापरत आहे. म्हणजेच हे मनी लॉन्डरिंगचं प्रकरण आहे. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जबाब घेऊन ताबडतोब याप्रकरणी कारवाई केली पाहिजे.” (Sanjay Raut)
(हेही वाचा –Sudhakar Badgujar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस!)
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला
“आज जे महाराष्ट्रावर चाल करुन येत आहेत, ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले, तेथे औरंगजेबाचा दाहोदमध्ये जन्म झाला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करुन येत आहे.” असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community